मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 ‘मृत’ मतदार, धक्कादायक आकडेवारी आली समोर..


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बोगस मतदार आणि मृत मतदार यावरून राज्यात अनेकदा राजकीय वाद सुरु आहेत. असे असताना आता मुंबईतून एक संतापजनक माहिती उघड झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगराच्या मतदार याद्यांमध्ये तब्बल 4 लाख 78 हजार 308 ‘मृत’ मतदारांची नावे अद्यापही तशीच
असल्याचे समोर आले आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी पुराव्यानिशी हे समोर आणले आहे. ईव्हीएम’वर खापर फोडणाऱ्या आणि लोकशाही धोक्यात असल्याचा कंठशोष करणाऱ्या विरोधकांना या पावणेपाच लाख बोगस मतदारांचा सुळसुळाट कसा दिसत नाही? मतांच्या जोगव्यासाठी हे राजकीय पक्ष आता बांगलादेशी घुसखोरांच्या मदतीने निवडणुका हायजॅक करणार का, असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

हा केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा नाही. तर या ‘मृतांच्या’ ओळखीचा वापर करून बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना बोगस मतदान करवून मुंबईवर ताबा मिळवण्याचे भयंकर षडयंत्र तर शिजत नाही ना? असा खळबळजनक सवाल आता उपस्थित झाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

यामध्ये आता मुंबई उपनगर एकूण 78,30,011 मतदारांपैकी तब्बल 3,34,620 मतदार हे मृत आहेत. मुंबई शहरातील एकूण 1,43,688 मृत मतदार अद्याप यादीत आहेत. विशिष्ट भागातच मृतांचे प्रमाण सर्वाधिक का? धक्कादायक बाब म्हणजे माहिममध्ये 7.72 टक्के, भायखळामध्ये 6.71 टक्के, शिवडीत 6.26 टक्के, तर उपनगरात कलिना (5.63%), कुर्ला (5.07%) आणि वांद्रे पूर्व (4.74%) या भागात मृत मतदारांची संख्या लक्षणीय आहे.

दरम्यान, या भागात बेकायदेशीर घुसखोरांचे अड्डे असल्याचे वारंवार समोर येतात. मृत व्यक्तींच्या नावावर बोगस कागदपत्रे (आधार कार्ड, रेशन कार्ड) बनवून या बांगलादेशी घुसखोरांना ‘अधिकृत’ मतदार बनवण्याचा हा देशद्रोही खेळ तर नाही ना, याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. यामुळे येणाऱ्या काळात यावरून राजकीय वातावरण तापणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!