तुम्हाला ठाकरे, शिंदे की फडणवीस? तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री चांगला वाटतो? तुकाराम मुंढेंचं उत्तर काय? जाणून घ्या…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अन्न प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे चर्चेत आहेत. त्यांना उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मुंढे म्हणाले, तुमचा रिसर्च जास्त चांगला वाटायला लागलाय, असं मिश्किल उत्तर तुकाराम मुंढेंनी दिले.
तसेच तुमच्यामुळे आता मला ते चेक करावं लागेल खरंच एवढं होतं की नाही. कदाचित असेल, मला माहित नाही, काउंट केलेलं नाही. पण आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, आता हा विषय काय इथे डिस्कशनचा नाही. पण हा विषय निघाला म्हणून सांगतो. माझ्या करिअरमधल्या पहिल्या पोस्टिंगमध्ये माझा वेटिंग पिरियड होता.

माझ्या पहिल्या पोस्टिंगसाठीच मी वेटिंगवर होतो. आता का झाला, कसा झाला, मला माहित नाही. वेटिंग पिरियडमध्ये राहणं ही चांगली गोष्ट नाही, माझ्यासाठीही नाही किंवा शासनासाठीही चांगली नाही, असं तुकाराम मुंढे म्हणाले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दररोज भेसळयुक्त कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे.


एका कार्यक्रमात तुकाराम मुंढे त्यांना उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, या तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिले. या सगळ्यांच्या कार्यकाळात तुम्हाला किमान अडीच वर्षे कुठेच पोस्टिंग दिली नव्हती.
तर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांपैकी तुम्हाला कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?, असा प्रश्न तुकाराम मुंढेंना विचारण्यात आला. यावर तुकाराम मुंढे यांनीही स्पष्ट उत्तर दिलं. यामुळे याची चांगलीच चर्चा सुरू झाली.