मोठी बातमी! राज्यातील 94 हजार शेतकरी कर्जमाफीतून वगळले; तुमचं नाव तर नाही ना?


मुंबई : राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

आजपासून 7,000 कोटी रुपये डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. या योजनेमुळे 2 लाख रुपयांपर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, 94 हजार आयकरदाते शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.

योजनेतील उर्वरित जवळपास 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच एकवेळ समझोता (OTS) अंतर्गत कर्जफेड करणाऱ्या 6 लाख 25 हजार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

NPA कर्जदारांनाही मोठा दिलासा

नापिकी, अवकाळी पाऊस आणि इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांची कर्जखाती बुडीत (NPA) झाली होती. त्यामुळे त्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या. आता राज्य सरकारने सर्व बँकांसाठी व्याज सवलत योजना लागू केली असून, NPA शेतकऱ्यांना ‘कूलिंग पीरियड’ न ठेवता पुन्हा कर्ज देण्यास बँकांनी मान्यता दिली आहे.

योजनेतील महत्त्वाचे मुद्दे

30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार.
महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील 12 लाख लाभार्थी शेतकऱ्यांनाही फायदा.
राज्य सरकारने अतिरिक्त 4,395 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
यापूर्वीच्या 36,585 कोटींसह एकूण 40,980 कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार.
राज्यातील 56 लाख पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार.
नियमित कर्जफेड करणाऱ्या 23.63 लाख शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार.
16.96 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून 7,000 कोटी रुपये DBT द्वारे जमा होण्यास सुरुवात.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माहितीनुसार, कर्जमाफीची प्रक्रिया तीन टप्प्यांत पूर्ण होणार असून ऑगस्टअखेरपर्यंत ती सुरू राहण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात 553, तर दुसऱ्या टप्प्यात 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पात्र शेतकऱ्यांना एकूण 40 हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!