LPG सिलेंडर वापरणाऱ्यांनो सावधान! ‘हे’ काम न केल्यास गॅस बुकिंग होणार बंद; घरबसल्या करा पूर्ण

पुणे : एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. इंडियन ऑइल, भारत गॅस आणि एचपी गॅसच्या ग्राहकांसाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. वेळेत e-KYC पूर्ण न केल्यास गॅस सिलेंडरचे बुकिंग अडकण्याची किंवा काही प्रकरणांमध्ये रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया आता घरबसल्या मोबाईलवरूनच करता येणार आहे.
सरकारकडून बनावट ग्राहकांवर आळा घालण्यासाठी आणि अनुदानाचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी e-KYC सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व एलपीजी ग्राहकांनी शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या ॲपद्वारे करा e-KYC
IndianOil ग्राहक – IndianOil One ॲप
Bharat Gas ग्राहक – HelloBPCL for Business ॲप
HP Gas ग्राहक – HP Pay ॲप


ही सर्व ॲप्स Google Play Store वर मोफत उपलब्ध आहेत.
घरबसल्या e-KYC कशी कराल?
सर्वप्रथम संबंधित गॅस कंपनीचे ॲप डाउनलोड करून मोबाईल नंबर किंवा ग्राहक क्रमांकाने लॉगिन करा. त्यानंतर e-KYC पर्याय निवडा. पुढे Aadhaar FaceRD ॲपच्या मदतीने फेस स्कॅन किंवा बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करा. प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर e-KYC अपडेट होईल.
याशिवाय PMUYच्या अधिकृत वेबसाइटवरूनही e-KYC पूर्ण करता येते. विशेषतः उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
मोबाईलवर प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचण आल्यास ग्राहकांनी जवळच्या गॅस वितरकाकडे जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी किंवा हेल्पलाइन 1800 2333 555 वर संपर्क साधावा.