पुणेकरांनो सावधान! 30 जुलैला ‘या’ भागांचा पाणीपुरवठा पूर्ण बंद; तुमचा परिसर यादीत आहे का?


पुणे : ऐन पावसाळ्यात पुणेकरांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून लष्कर जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशन येथे तातडीची विद्युत व यांत्रिकी देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

त्यामुळे गुरुवार, 30 जुलै रोजी पूर्व पुण्यातील अनेक भागांचा संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार, 31 जुलै रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पूर्व भागात पाइपलाइन गळती आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याने ही दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

या भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

रामटेकडी टाकी परिसर :
काळेपडळ, गाडीतळ, गोंधळेनगर, सातववाडी, हडपसर गावठाण, महंमदवाडी, वाडकर मळा, कृष्णानगर, राजीव गांधी नगर, तरवडे वस्ती, वैदुवाडी, भीमनगर, शिंदेवस्ती, ससाणेनगर, माळवाडी, मुंढवा, मगरपट्टा सिटी, केशवनगर, साडेसतरा नळी, काळेबोराटेनगर, हांडेवाडी रोड आणि भुजबळ परिसर.

वानवडी टाकी परिसर :
वानवडी गावठाण, चौगुलेमळा आणि शितळादेवी मंदिर परिसर.

बकरी हिल टाकी परिसर :
कोंढवा गावठाण, शिवनेरीनगर, मिठानगर, पारगेनगर, कौसरबाग, साळुंखे विहार, एनआयबीएम रोड, उंड्री रोड, आझादनगर, शांतीनगर, केदारीनगर, काकडे मैदान, मानेवस्ती, जांभूळकर वस्ती, जगताप चौक, विकासनगर, शिंदे छत्री, सिद्धार्थनगर, ब्रह्मा काउंटीज आणि कोणार्क इंद्रायू परिसर.

हाय सर्व्हिस टाकी परिसर :
बी. टी. कवडे रोड, घोरपडी, सेंट पॅट्रिक टाऊन, शेवकरवस्ती, होलेमळा, एस. व्ही. नगर आणि लक्ष्मीनगर.

कॅन्टोन्मेंट ते कल्याणीनगर :
पुणे कॅन्टोन्मेंट, कॅम्प, कमांड हॉस्पिटल, मोदीखाना, एम. जी. रोड, ईस्ट स्ट्रीट, रेसकोर्स, श्रावस्ती नगर, गुलमोहर पार्क, कोरेगाव पार्क ब्रिज, येरवडा गावठाण, इराणी मार्केट, गुंजन, गवळीवाडा, जिजामातानगर, मदर तेरेसा नगर, कुमार पर्णकुटी, कामराजनगर, नेताजी नगर, गांधीनगर, काश्मीर कॉलनी, भीमाशंकर वसाहत, यशवंतनगर, सुभाषनगर, नवी खडकी, संगमवाडी, जयजवाननगर, अशोकनगर, शास्त्रीनगर, नगर रस्ता आणि कल्याणीनगर.

लष्कर ते खराडी पंपिंग परिसर :
खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, ईऑन परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, थिटे वस्ती, तुकाराम नगर, यशवंतनगर, चंदननगर, सुनितानगर, धर्मनगर, सोमनाथनगर, गार्डेनिया, धनलक्ष्मी सोसायटी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, मतेनगर, महावीरनगर, माळवाडी आणि मुन्नुरवार सोसायटी.

महापालिकेने नागरिकांना 30 जुलैपूर्वी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे तसेच पुढील दोन दिवस पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!