शरद पवार मोदींना भेटले, मग पटेल पार्थ पवार शरद पवारांना भेटले, विलीनीकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला?

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरु आहेत. याबाबत दिल्लीत एक महत्त्वाची घडामोड घडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतल्याचे समजते.
यामुळे भेटीत याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या भेटीमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. नुकतीच शरद पवार यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार आणि प्रफुल पटेल हे दोघे शरद पवारांना भेटायला गेले होते.

यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चक्रं फिरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. संसदेत येऊन घातलेल्या लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएसोबत जाण्याची चर्चा सुरु आहे. यामुळे या सगळ्या हालचाली सुरू आहेत.


भाजप नेतृत्वाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होऊनच एनडीएमध्ये येण्याची अट घातल्याचीही माहिती समोर आली होती. यामुळे शरद पवार नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पार्थ पवार यांनी शरद पवार यांची याबाबत भेट घेतली असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी याला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात तटकरे यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र अनेक घडामोडी सध्या राज्यात घडत आहेत.