केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 47 अधिकारी तडकाफडकी बडतर्फ; CJPच्या आंदोलनाला मोठं यश?

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात निर्माण झालेल्या संतप्त वातावरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत 47 अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विविध स्तरांवर चर्चांना उधाण आले आहे.
NEET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप समोर आल्यानंतर देशभरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या वादानंतर परीक्षा प्रक्रिया रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण प्रकरणामुळे परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले.

दरम्यान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत असून, दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP)कडून आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 47 अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे.


NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अनिश्चिततेत आले होते. त्यानंतर सरकारने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत ही मोठी कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे राजकीय आणि प्रशासकीय वळण मिळाले आहे.