अखेर पेपरफुटी प्रकरणावर सरकार झुकलं! उच्चशिक्षण विभागाच्या सचिवांना हटवले, मोदी सरकारचा मोठा निर्णय…


नवी दिल्ली : गेला काही दिवसांपासून दिल्लीत मोठा गोंधळ सुरु आहे. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अनेक तरुण रस्त्यावर उतरले आहेत.यावर आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. नीट पेपरफुटीच्या विरोधात सुरु असलेल्या या विद्यार्थ्यांच्या देशव्यापी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय फेरबदलाचा भाग म्हणून शिक्षण सचिवांची बदली करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नरेश पाल गंगवार यांची शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केली. आतापर्यंत या पदावर असलेल्या विनीत जोशी यांची पंचायत राज विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याबाबत वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर झालेले हे फेरबदल उल्लेखनीय आहेत.

असे असले तरी विद्यार्थी शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यावरच ठाम आहेत. NEET परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपावरुन सुरु असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या फेरबदलाचे कोणतेही कारण सरकारी आदेशात स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र आंदोलनांची तीव्रता कमी करण्यासाठी सरकारने ययाबाबत निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

पेपरफुटी प्रकरणात आपला निषेध नोंदवण्यासाठी नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर तरुणांची गर्दी वाढत असल्याने सरकारवर सतत दबाव आहे. पेपरफुटीच्या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या शिक्षण सचिवांना पंतप्रधान मोदीजींनी बदलले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याबाबत वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची बदली उल्लेखनीय आहे.

प्रश्नपत्रिका फुटीस जबाबदार असलेल्यांवर, तसेच ज्यांनी यात ढिलाई किंवा निष्काळजीपणा दाखवला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. असे भाजपकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, दिल्लीत अजूनही वातावरण तापलेले असून देशात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यंना मारहाण झाल्याने आंदोलन केली जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!