आताची सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नाराज? नेमकं कारण काय?

मुंबई : शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या आमदारांमध्ये नाराजीचं वृत्त हाती आलं आहे.

येत्या 22 जुलै रोजी दिवंगत अजित पवार यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे. या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने आमदारांना महत्वाच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु या सूचनेवरून आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. त्यातच आता २२ जुलै रोजी होणाऱ्या दिवंगत अजित पवार यांच्या शासकीय जयंती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पक्षाने दिलेल्या सूचनांमुळे काही आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून, अजित पवार यांचा थोरपुरुषांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार शासकीय स्तरावर त्यांची जयंती साजरी केली जाणार आहे.

दरम्यान, जयंतीनिमित्त राज्यभर लावण्यात येणाऱ्या बॅनरवर एकाच प्रकारचे अधिकृत छायाचित्र वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बॅनर लावल्यानंतर त्याचे जिओ-टॅगिंग करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सूचनांवरून पक्षातील काही आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा असून, पक्षाच्या निर्णयामुळे आमदारांवर अविश्वास दाखवला जात आहे का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जयंतीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्यांकडून राज्यभर बैठका घेतल्या जात असून, विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. मात्र, एकसारखे छायाचित्र वापरणे आणि जिओ-टॅगिंगची सक्ती यावरून काही आमदारांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी उधाण आले आहे.