नवरा-बायकोसारखं राहू लागले, दाढी करताना पाहिलं अन् उघड झालं मोठं गुपित; काही वेळातच रेल्वे ट्रॅकजवळ सापडला मृतदेह


गुजरात : सोशल मीडियावर झालेली ओळख एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील राजकोट येथे उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर मुलगी असल्याचे भासवत एका तरुणाने दुसऱ्या तरुणाशी मैत्री केली. दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र, समोरची व्यक्ती प्रत्यक्षात मुलगी नसून पुरुष असल्याचे समजल्यानंतर संतापलेल्या तरुणाने त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना राजकोट जिल्ह्यातील शापर-वेरावल परिसरातील आहे. पीयूष नावाच्या २० वर्षीय तरुणाची सोशल मीडियावर ‘पूनम’ नावाच्या प्रोफाइलशी ओळख झाली होती. हे प्रोफाइल चंदन कुमार नावाच्या तरुणाने तयार केले होते. त्याने स्वतःला मुलगी असल्याचे सांगून पीयूषचा विश्वास संपादन केला आणि दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली.

काही काळानंतर दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र, धार्मिक कारणे सांगत चंदन पीयूषशी शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, एके दिवशी पीयूषने चंदनला दाढीचे केस काढताना पाहिले. त्यानंतर समोरची व्यक्ती मुलगी नसून पुरुष असल्याचे त्याच्या लक्षात आले. या घटनेनंतर पीयूषने त्याच्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चंदन त्याचा पाठलाग करत असल्याचा आरोप आहे.

या पार्श्वभूमीवर २५ जून रोजी शापर-वेरावल परिसरात पीयूषने चंदनच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुरावे लपवण्यासाठी मृतदेह रेल्वे स्थानक परिसरात टाकून दिल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

घटनेचा तपास करताना पोलिसांनी आरोपी पीयूषला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!