पावसात कुठे अडकला तर? मोबाईलमध्ये आत्ताच सेव्ह करा हे महत्त्वाचे हेल्पलाईन नंबर


पुणे : भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी पावसाचा मोठा इशारा जारी केला असून मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर काही भागांसाठी ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली असून प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 4 ते 6 जुलै या कालावधीत मुंबई महानगर प्रदेश (MMR), कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत या काळात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून काही सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक प्रवासात अडथळे निर्माण होण्याबरोबरच काही ठिकाणी संरचनात्मक नुकसान होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने विविध भागांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या हेल्पलाईनवर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका: 1916
पालघर: 02525-297474 / +91 82379 78873
ठाणे महानगरपालिका: 022-25364779 / 022-25301740 / +91 93723 38827
ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष: 1800-222-108 / 8657887101
पनवेल महानगरपालिका: 022-27458040 / 41 / 42

दरम्यान, काही जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, विशेषतः घाट रस्ते आणि सखल भागांमध्ये अधिक सतर्कता बाळगावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!