पोलीस दलात मोठा फेरबदल! तब्बल ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा कोणाची कुठे नियुक्ती..

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयात पोलीस निरीक्षकांच्या (PI) मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या फेरबदलांचे आदेश जारी करण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत पोलीस स्थापना मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या फेरबदलात अनेक पोलीस निरीक्षकांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, काही अधिकाऱ्यांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढही देण्यात आली आहे.
‘या’ अधिकाऱ्यांना मिळाली मुदतवाढ
प्रशासकीय कारणास्तव गुन्हे शाखेचे सचिन पांडुरंग गायकवाड, प्रतिबंधक कक्षाच्या सुषमा संदीप सोनावणे (येवले) आणि राजेंद्र जयवंत निकलजे यांना त्यांच्या सध्याच्या पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

विविध विभागांत नवीन नियुक्त्या
या बदल्यांमध्ये डोंबिवली, मुंब्रा, कोळशेवाडी, कासारवडवली, टिळकनगर, भिवंडी शहर, आर्थिक गुन्हे शाखा (EOW), वाहतूक शाखा तसेच इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बदल्या पुढीलप्रमाणे आहेत:
पोलीस निरीक्षकांच्या बदल्या..
अशोक रावजी उतेकर – पीओएसटी रिपोर्ट → व्हीपीओ, वागळे इस्टेट
गणेश संभाजीराव जावडवाड – डोंबिवली पोलीस ठाणे → व्हीपीएन, मुंब्रा
अभय चंद्रनाथ महाजन – नौपाडा पोलीस ठाणे → व्हीपीएन, कोळशेवाडी
सुरेश सिंह रामसिंह गंड – मार्केट पोलीस ठाणे → खडकपाडा पोलीस ठाणे
राजेश सदाशिव शिरसाठ – विशेष शाखा → मुंब्रा पोलीस ठाणे
नितीन दौलतराव वेतन – विशेष शाखा → शहर वाहतूक शाखा
गहिनीनाथ सरजेराव खेल – विष्णुनगर पोलीस ठाणे → शिवाजीनगर पोलीस ठाणे
सुधाकर शंकर यादव – शहर वाहतूक शाखा → मुंब्रा पोलीस ठाणे
अमरनाथ रामचंद्र वाघमोडे – विशेष शाखा → कोळशेवाडी पोलीस ठाणे
राजू भीकाजी पचोरकर – शहर वाहतूक शाखा → व्हीपीएन, डोंबिवली
विनोद भालेराव पाटील – शांतीनगर पोलीस ठाणे → भिवंडी शहर पोलीस ठाणे
गणेश मधुकर न्हायाडे – कोळशेवाडी पोलीस ठाणे → व्हीपीएन, राबोडी
बाबासाहेब भास्कर दुकाले – मार्केट पोलीस ठाणे → व्हीपीएन, मार्केट
अतुल सुरेश अडुरकर – शांतीनगर पोलीस ठाणे → भिवंडी शहर पोलीस ठाणे
मल्हारी किसन मेमणे – वर्तकनगर पोलीस ठाणे → आर्थिक गुन्हे शाखा (EOW)
सवाजी गोविंद नाईक – कोळशेवाडी पोलीस ठाणे → महात्मा फुले चौक पोलीस ठाणे
पंकज प्रल्हाद भलेराव – डोंबिवली पोलीस ठाणे → कोळशेवाडी पोलीस ठाणे
विजय भीमराव नाईक – महात्मा फुले चौक पोलीस ठाणे → व्हीपीएन, टिळकनगर
अनिल नाथुराम गायकवाड – पीओएसटी रिपोर्ट → नियंत्रण कक्ष, कल्याण
अनिल चंद्रकांत शिंदे – मुंब्रा पोलीस ठाणे → कासारवडवली पोलीस ठाणे
विशाखा बजरंग झंडे – त्वरित प्रतिसाद विभाग → चितळसर पोलीस ठाणे
रंजन रघुनाथ सावंत – कासारवडवली पोलीस ठाणे → वर्तकनगर पोलीस ठाणे
प्रतापराव अशोकराव भोसले – ठाणेनगर पोलीस ठाणे → व्हीपीएन रिपोर्ट
या सर्व अधिकाऱ्यांना तातडीने नवीन पदस्थापनाच्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आल्या आहेत.