लाडक्या बहिणींचं बँक खातं होणार फुल्ल? 3000 रुपये मिळणार? समोर आली मोठी माहिती

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, जुलै महिना सुरू होऊनही अनेक पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये हप्त्याबाबत उत्सुकता वाढली आहे.

यापूर्वी सरकारने मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले होते. त्यानंतर मे महिन्याचा हप्ताही वितरित करण्यात आला. मात्र, ई-केवायसी अपूर्ण असणे किंवा पात्रता निकष पूर्ण न करणे अशा कारणांमुळे अनेक महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला होता.
सध्या महिलांना जून महिन्याच्या 1,500 रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा असून, जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये एकत्र मिळणार का, याबाबत चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याचा हप्ता जुलैच्या 12 ते 15 तारखेच्या दरम्यान जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

तसेच, जुलै महिन्याचा हप्ता किंवा जून-जुलैचे पैसे एकत्र दिले जाणार का, याबाबतही सरकारने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.