केतनचा मृतदेह घरी येताच सियाची ‘ती’ गोष्ट खटकली; चक्रावून टाकणारी माहिती समोर


: पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या प्रकरणाने आता कथित हत्येचे गंभीर वळण घेतले असून, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत.

विशाल अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर जेव्हा केतनचा मृतदेह घरी आणण्यात आला, तेव्हा त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिच्या वागण्यामुळे कुटुंबीयांना संशय आला. इतकी मोठी घटना घडूनही तिच्याकडून कोणतीही भावनिक प्रतिक्रिया दिसून आली नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

याप्रकरणी आणखी गंभीर आरोप करताना त्यांनी सांगितले की, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून जवळीक निर्माण झाली होती. त्यातूनच केतनला मार्गातून दूर करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

विशाल अग्रवाल यांनी असा दावाही केला की, 18 जून रोजी घडलेल्या घटनेपूर्वी केतनला संपवण्याचे आणखी दोन प्रयत्न करण्यात आले होते. इंडोनेशियातील बाली येथे पहिला प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप असून तो अयशस्वी ठरला. त्यानंतर 14 जून रोजीही लोहगड किल्ल्यावर नेऊन कट राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तोही फसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 19 जून रोजी सियाचा वाढदिवस दोन्ही कुटुंबीयांनी एकत्र साजरा करण्याचे नियोजन होते. मात्र, त्याआधीच 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला जाण्याचा आग्रह धरण्यात आला. त्यावेळी चेतन चौधरी आधीच किल्ल्यावर उपस्थित होता आणि पूर्वनियोजित कटानुसार केतनला दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

तथापि, या सर्व बाबी मृताच्या कुटुंबीयांनी केलेले दावे असून, प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमके सत्य समोर येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!