गौतमी पाटीलने घेतली उदयनराजे यांची भेट, भेट नेमकी कशासाठी?, राजकीय चर्चांना उधाण…

सातारा : सतत चर्चेत असणारी डान्सर गौतमी पाटीलने साताऱ्यात आली असता खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी गौतमीने उदयनराजे यांना खास भेटवस्तू देखील दिली आहे. यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी तिने विविध विषयांवर चर्चा देखील केली आहे. या भेटीत तिने खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांचा आवडता परफ्युम भेट भेट दिला आहे.
माझे जरी चाहते असले तरी छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा मोठी नाही. असे देखील माध्यमांशी बोलताना गौतमी म्हणाली आहे. खूप कमी काळात गौतमीने प्रसिद्धी मिळवली आहे.

राज्यातील विविध छोट्या-मोठ्या गावांत गौतमी पाटीलचे कार्यक्रम होत असतात. यात्रांच्या व समारंभांच्या निमित्ताने गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळे ती चर्चेत असते.
Views:
[jp_post_view]