सोने खरेदीदारांसाठी मोठी खुशखबर! दरात मोठी घसरण; जाणून घ्या १० ग्रॅमचा नवा भाव..


नवी दिल्ली : सराफा बाजारातून ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आता मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजारातील तेजी, नफावसुली आणि जागतिक घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या दरांवर दबाव आला असून सोनं आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, १८ जून रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली. गेल्या तीन दिवसांत सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम सुमारे २ हजार रुपयांनी कमी झाले असून २४ कॅरेट सोनं १.५३ लाख रुपयांच्या पातळीवर आले आहे.

चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. एका दिवसात चांदीचे दर प्रतिकिलो जवळपास ५ हजार रुपयांनी घसरले असून त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणांनंतर गुंतवणूकदारांकडून नफावसुली वाढली आहे. तसेच जागतिक स्तरावरील तणाव काहीसा कमी झाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे असलेला ओढा कमी झाला आहे. याचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या दरांवर झाला आहे.

दरम्यान, किमतींमध्ये घसरण झाली असली तरी भारतातील सोन्याची मागणी कायम मजबूत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या दरांनंतरही ग्राहकांकडून खरेदी सुरू असल्याचे बाजारातील चित्र आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!