अट्टल गुन्हेगार गणेश विरकर सहा महिन्यांसाठी तडीपार; लोणी काळभोर पोलिसांची कारवाई


लोणी काळभोर : लोणी काळभोर परिसरात नागरिकांना त्रास देऊन दहशत निर्माण करनाऱ्या अट्टल गुन्हेगारावर लोणी काळभोर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगार गणेश बाळासाहेब विरकर याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

गणेश बाळासाहेब विरकर (वय ४०, रा. रुपनर वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश विरकर हा परिसरात वारंवार दहशत निर्माण करून सामान्य नागरिकांना त्रास देत होता. त्याच्या कृत्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. त्याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

सराईत गुन्हेगारांच्या वाढत्या कृत्यांमुळे कायद्याविषयी नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवता यावे, यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ अन्वये गणेश विरकर याच्याविरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. सदर प्रस्तावाचा अभिलेख तपासून पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तो मंजूर केला.

त्यानुसार गणेश विरकर याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये धाक निर्माण झाला असून, सामान्य नागरिकांनी लोणी काळभोर पोलिसांच्या धाडसी आणि प्रभावी कारवाईचे स्वागत केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!