धोंड्याच्या महिन्यात ‘हीच’ भेटवस्तू पाहिजे; पतीच्या मागणीला कंटाळून पत्नीची पाचव्या मजल्यावरून उडी, पुणे हादरलं


पुणे : धोंड्याच्या महिन्यात लेक-जावयाचे स्वागत, भेटवस्तू आणि आनंदाचे क्षण साजरे केले जात असताना पुण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. माहेरून सोन्याची अंगठी आणली नाही म्हणून सासरच्यांकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका 32 वर्षीय विवाहितेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हडपसर परिसरातील शंकर मठाजवळील ग्रँड स्क्वेअर सोसायटीमध्ये 10 जून रोजी हा प्रकार घडला. लक्ष्मी मारुती मिरेकर (वय 32) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोंड्याच्या महिन्यानिमित्त माहेरून एक तोळ्याची सोन्याची अंगठी आणावी, अशी मागणी सासरच्या मंडळींकडून करण्यात येत होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने लक्ष्मी यांचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून त्यांनी राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतली. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वानवडी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला अटक केली आहे. तक्रारीनुसार पती मारुती मिरेकर आणि सासू नागू मिरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून हुंडा आणि अनिष्ट रूढींमुळे आणखी एका महिलेचा बळी गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. वानवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!