रेवती सारंगच लग्न वेळेवर होणार का? पत्रिका वाटल्यावर झाला गोंधळ, महत्वाची माहिती आली समोर…


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी आणि उद्योजक अरूण लखानी यांच्या मुलाचं लग्न ठरलं असून लवकरच ते पार पडणार आहे. असे असताना पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या सल्ल्यानंतर अरूण लखानी यांनी मोठा निर्णय घेत मुलगा व सुनेच्या लग्नाचं रिसेप्शन पुढे ढकलण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

नागपूरमध्ये होणार रिसेप्शन आता पुढे ढकलण्यात आलं. काल माध्यमांशी संवाद साधताना खुद्द सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलं. मोठे खर्च टाळा, सार्वजनिक वाहनांनी प्रवास करा, परदेशवारी नको, असं पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित करताना सांगितलं होत.

त्यांच्या या आवाहनाला देशातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. सामान्य नागरिक, उद्योजक, राजकारणी यांनी पंतप्रधानांच म्हणणं ऐकत इंधन बचत करताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आणि आमच्या घरातून विनंती आली की रेवती आणि सारंगचं रिसेप्शन पुढे ढकलू शकतो का? त्यानंतर आम्ही चर्चा करून निर्णय घेतला, असे लखानी यांनी सांगितले आहे.

यामुळे 27 नोव्हेंबर रोजी होणारं रिसेप्शन आता 16 डिसेंबर ला पुढे ढकललं आहे, असं अरूण लखानी म्हणाले. आम्ही पत्रिकाही छापल्या होत्या, त्या वाटल्या होत्या. पण काही गोंधळ झाला. मात्र असं असलं तरी रेवती आणि सारंग यांचं लग्न वेळेवर होणार आहे, असंही लखानी म्हणाले. सुप्रिया ताई या डिसेंबरमध्ये दिल्लीला रिसेप्शन देणार आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येणार आहेत.

आम्ही सर्वांना पत्रिका दिल्या आहेत. या लग्नात कोण येणार, हे आता 20 तारखेला समजणार आहे.दरम्यान, अमेरिका-इस्रायल युद्धामुळे जगभर इंधन संकट निर्माण झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, अनेक नागरिक आणि उद्योजकांनी बचत करण्यास सुरुवात केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!