काळजी घ्या! राज्यात उष्मघाताचा पहिला बळी, पुढील तीन दिवस उष्णतेची लाट


पुणे : सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळा जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व रावेर येथे उष्मघातामुळे मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. नम्रता चौधरी वरणगाव येथून धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी येत असताना त्यांना उन्हाचा तडाखा बसला.

उलट्या व मळमळ झाल्यामुळे त्या घरातच बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात तापमान चाळीशीच्या वर गेले आहे. जळगावमध्ये काल सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची झाली नोंद झाली. दरम्यान, बंगालच्या उपसागरात बदल होत आहे.

याठिकाणी मोचा वादळ सक्रीय झाले आहे. त्यामुळे अवकाळी पडणारा पाऊस जाऊन राज्यातील कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!