आमदार रोहित पवार कुलूप घेऊन CID ऑफिसमध्ये, कार्यालयाला कुलूप लावण्याचा दिला इशारा, नेमकं घडलं काय?


पुणे : आमदार रोहित पवार कुलूप घेऊन CID ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत. या कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अजितदादांच्या अपघाती मृत्यूला 4 महिने लोटले तरीही CID चा तपास पुढं सरकत नाही, किंबहुना या अपघात / घातपाताचा तपासच होऊ नये म्हणून तर हा तपास CID कडे दिला नाही ना, अशी आता शंका यायला लागलीय, असे ते म्हणाले.

तसेच AAIB रिपोर्ट देत नाही आणि CID मात्र AAIB च्या रिपोर्टकडे बोट दाखवून स्वतःची सुटका करून घेत आहे. आज CID ऑफिसला भेट दिली असता जबाबदार अधिकारी तर भेटलेही नाही पण केवळ गोलमाल, बेजबाबदार आणि न पटणारी उत्तरं संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाली.

संबंधित अधिकारी काहीच काम करत नसतील तर त्यांच्या खर्चाचा भुर्दंड सरकारने का सहन करावा? त्यामुळं आज केवळ टाळं दाखवलं पण पुढच्या वेळी भेटीला येईल त्यावेळी खर्च कमी करण्याच्या मा. पंतप्रधान साहेबांच्या आवाहनानुसार CID कार्यालयाला आम्ही टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. बेजबाबदार आणि न पटणारी उत्तरं संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाली. यामुळे येणाऱ्या काळात तपास होण्यासाठी अजून संघर्ष करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अपघाताला आता 4 महिने झाले मात्र केवळ गोलमाल, बेजबाबदार आणि न पटणारी उत्तरं संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळात आहेत. यामुळे येणाऱ्या काळात तपास पुढे सरकणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!