मोठी बातमी! साखर उद्योगाला मोठा दिलासा, साखर एमएसपी, इथेलॉन, कर्जाचे व्याज, अमित शहांनी घेतला महत्वाचा निर्णय…

नवी दिल्ली : सध्या साखर उद्योगातील अडचणी तसेच भविष्यातील उपाय योजना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी दिल्लीत येथे केंद्रीय सहकार अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीस साखर उद्योगातील नेमक्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या सगळ्या गोष्टींवर येणाऱ्या 10 दिवसात निर्णय होईल असेही सांगितले आहे.

सध्या साखर उद्योग आणि साखर कारखानदारीत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामध्ये साखर निर्यातीवर बंदी घातल्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. अनेक वर्षे साखरेच्या एमएसपीमध्ये एफआरपीच्या तुलनेत न झालेली वाढ इत्यादी कारणांनी साखर उद्योग अडचणीत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय साखर महासंघाच्या वतीने ही बाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारपुढे आणली होती.
त्यानुसार आज ही बैठक घेण्यात आली. साखरेच्या दरात वाढ न होणे आणि एफआरपीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दरातील तफावत साखर उद्योगाला सोसावी लागत आहे. याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करून यातून मार्ग काढू, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार आज सविस्तर चर्चा झाली असून यावर मार्ग काढण्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे.

तसेच इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. हा उद्योग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अनेकांच्या जीवनमानाशी संबंधीत व्यवसाय आहे. अनेक शेतकरी, व्यापारी, कामगार यांच्यासाठी हा महत्वाचा भाग आहे. यामुळे यामध्ये काही बदल करणे आवश्यक आहे.

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्याचे मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.