मोठी बातमी! इंधन तुटवड्यामुळे शाळा आठवड्यातून तीन दिवसच सुरू राहणार? ऑनलाइन वर्ग सुरू ठेवण्याची मागणी…


मुंबई : गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दरात चारवेळा वाढ झाली आहे. सोमवारी देशभरात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्यानुसार आता पेट्रोलचे दर  2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल देखील उपलब्ध होत नाही.

यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. राज्यातील वाढत्या इंधन दरवाढीमुळे स्कुल बस मालकांवर मोठे संकट ओढावले आहे. पुढील महिन्यात राज्यभरात शाळा सुरु होणार आहेत. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने त्याच दरात स्कुल बसची सेवा पुरवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही.

त्यामुळे एकाच सत्रात शाळा सुरु ठेवाव्यात, अशी मागणी स्कुल बस संघटनेकडून करण्यात आली आहे. आठवड्यातून तीन दिवसच शाळा भरवा आणि दोन दिवस ऑनलाइन वर्ग सुरू ठेवा, असे त्यांनी म्हटले आहे. यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.

राज्यात 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सर्वात आधी वाढ झाली होती. त्यानंतर दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत गेले होते. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात एकूण 7 रुपये 38 पैशांची वाढ झाली आहे. तसेच डिझेलच्या दरात 7 रुपये 09 पैशांची वाढ झाली आहे. यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे.

दरम्यान, शाळा सुरू होण्याआधी एक जूनपर्यंत राज्य सरकारने आपली भूमिका मांडावी, अशी विनंती स्कूलबस मालकांकडून करण्यात आली आहे. आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!