पुण्यात 400 कोटींची गुंतवणूक अन् ‘या’ क्षेत्रात मोठा प्रकल्प; CM फडणवीसांच्या उपस्थितीत महत्त्वाचा करार


पुणे : पुणे जिल्ह्यात मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे पुढील दहा वर्षांत सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 1000 हून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार सह्याद्री अतिथीगृहात पार पडला. यावेळी राज्य सरकारकडून प्रकल्पासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय सहकार्य दिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

या कार्यक्रमाला अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगण, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच अग्रेको इंडिया कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

करारानुसार पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारले जाणार आहे. हे केंद्र स्कॉटलंड बाहेरील अग्रेकोचे सर्वात महत्त्वाचे जागतिक उत्पादन केंद्र ठरणार आहे. प्रकल्पाचे काम याच वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे.

या गुंतवणुकीमुळे पुणे परिसरातील स्थानिक पुरवठा साखळीला मोठी चालना मिळणार असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक बाजाराशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

ऊर्जा उपकरण निर्मिती, प्रिसिजन इंजिनिअरिंग आणि शाश्वत तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राची क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!