पाण्यासाठी कृषीमंत्र्यांच्या तालुक्यात शेतकरी संतापले, पुण्यात बोंबाबोंब आंदोलन, आंदोलनात भरणे, पाटील आले अन्…! नेमकं काय घडलं?


पुणे : यावर्षीचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने याचा फटका अनेकांना बसला. शेतकरी देखील पाण्यासाठी मोठा संघर्ष करत आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पाण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याच तालुक्यात सध्या परिस्थिती बिकट झाली आहे. खडकवासला धरणाचे पाणी इंदापूरला न मिळाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

आज त्यांनी पुण्यातील सिंचन भवनासमोर बोंबाबोंब आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांसोबत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे चिरंजीव तथा पंचायत समितीचे सदस्य श्रीराज भरणेही सहभागी होते. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेच्या सभापती अंकिता पाटील यांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावून खडकवाला प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याशी पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा करत आहेत. यामुळे आता तरी पाणी मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अधिकाऱ्यांकडून फुरसुंगी येथील कालवा फुटण्याचे कारण देऊन एक हजार क्युसेकने पाणी सोडले जात असल्याचे सांगत आहेत. तसेच जलसंपदा विभागातील काही कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन पाणी विकल्याचा आरोप इंदापुरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

उन्हाळी आवर्तन तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेच नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यातूनच आज सिंचन भवनासमोर ठिय्या मांडला आहे. प्रत्येक आवर्तनावेळी १३०० क्युसेकने कालव्यातून पाणी सोडले जाते, पण यावेळी फुरसुंगीत कालवा फुटण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे १००० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे, त्यामुळे पाणी पुढे जात नाही.

दरम्यान, भरणे हे मंत्री असून देखील अधिकारी ऐकत नाहीत, यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं कोणाकडे जायचं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या पाण्यावरून इंदापूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!