अजितदादा नंतर बारामतीचा ‘दादा’ कोण? रोहित पवारांच्या बारामतीमधील जनता दरबारामुळे चर्चा सुरू, नेमकं समीकरण काय?


बारामती : शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे अजित पवार यांच्या अपघातानंतर आक्रमक झाले आहेत. ते सध्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आमदार रोहित पवार यांनी आज बारामतीमध्ये एका जनता दरबाराचे आयोजन केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी 2029 च्या निवडणुकीबाबत केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर या जनता दरबारामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यामुळे सक्रियतेच महत्त्वाचा टप्पा आज बारामतीत पाहायला मिळणार आहे.

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आमदार रोहित पवार यांचा हा जनता दरबार आज दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. यामध्ये कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामतीमधील शारदानगर येथील आप्पासाहेब पवार सभागृहात’ हा कार्यक्रम पार पडणार आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून रोहित पवार बारामतीमधील नागरिकांशी थेट संवाद साधणार असून त्यांच्या स्थानिक समस्या जाणून घेणार आहेत. आता यावेळी किती प्रतिसाद मिळणार हे आजच समजेल.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून बारामती विधानसभा मतदारसंघात रोहित पवार यांनी आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे आज आप्पासाहेब पवार सभागृहात रोहित पवार जनता दरबार घेत आहेत. यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!