पुणे-सोलापूर महामार्गालगत उभ्या ट्रकच्या टँकमधून १४० लिटर डिझेलची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल..


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गालगत उभ्या असलेल्या दहा टायर ट्रकच्या टँकमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १४० लिटर डिझेल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी अर्जुन लक्ष्मण गाडे (वय २९, रा. थेऊर फाटा, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन गाडे हे बीएलआर लॉजिस्टिक इंडिया लिमिटेड, चाकण येथील कंपनीत ट्रक चालक म्हणून कार्यरत असून त्यांच्या ताब्यात अशोक लेलँड कंपनीचा दहा टायर ट्रक (एमएच ४३ सीई ४६६२) होता. ते माल घेऊन हुबळी (कर्नाटक) येथे जाणार होते.

१८ मे रोजी त्यांनी ट्रकमध्ये माल भरून कुंजीरवाडी येथे, पुणे-सोलापूर महामार्गालगत ट्रक उभा केला होता. ट्रकमध्ये सुमारे १५० लिटर डिझेल शिल्लक होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते ट्रकजवळ आले असता डिझेल टँकचे झाकण उघडे असल्याचे आणि जमिनीवर डिझेल सांडल्याचे दिसून आले. तपासणी केली असता अंदाजे १४० लिटर डिझेल गायब असल्याचे स्पष्ट झाले. चोरी झालेल्या डिझेलची किंमत सुमारे १३ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या मालवाहू वाहनांमधून डिझेल चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे वाहनचालकांकडून सांगितले जात आहे.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!