मोठी बातमी! वाल्मिक कराडची तब्येत बिघडली; तुरुंगातच सुरू उपचार, नेमकं काय घडलं?


बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बीडच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कराडची तब्येत अचानक बिघडल्याने त्याच्यावर कारागृहातच उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराड याला मूत्राशयाशी संबंधित त्रास जाणवत असून डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत ‘युरोसिसटायटीस’ म्हणजेच मूत्राशयाच्या संसर्गाचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याला कारागृहात सलाईन लावून उपचार करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, कराडची प्रकृती खालावत असल्याने जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली. पुढील उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे आधीच राज्यभरात खळबळ उडाली असताना आता मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या प्रकृतीमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!