मोठी बातमी! बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळले, अजित पवार यांचा अपघात झाला त्याच गावात घडली घटना….

बारामती : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाला होता. यामध्ये अजित पवार यांचे निधन झाले होते. असे असताना आज बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अजित पवार यांचे विमान ज्या गावात पडले, त्याच ठिकाणी हे शिकाऊ विमान कोसळल्याची माहिती आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली.
रेडबर्ड या कंपनीचे विमान गोजुबाबी गावाच्या हद्दीत पडलं. शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या शिकाऊ विमान कशामुळे पडलं, हे मात्र समजू शकले नाही. याबाबत सध्या तपास सुरू आहे. याठिकाणी अनेक विमाने कोसळत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, घटनेनंतर विमानतळ अधिकारी देखील याठिकाणी उपस्थित झाले आहेत. विमान कोसळल्यानंतर पुढील तपास सुरु आहे. यामध्ये किती पायलट होते, याबाबत देखील अजून माहिती समोर आली नाही. आज सकाळी ही घटना घडली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर गावकरी चिंतेत असून अजूनही अशा घटना घडत आहेत.
