पद्म पुरस्कारांची घोषणा, बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनला पद्मश्री पुरस्कार जाहीर…!


नवी दिल्ली : दिल्लीत 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी देशातील सर्वोच्च पुरस्कारांसाठी 106 जणांची निवड करण्यात आली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला देखील पद्मश्री पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर रवीना टंडन तिच्या भावना व्यक्त करत म्हणाली की, मी सन्मानित आणि कृतज्ञ आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही.

माझे योगदान, माझे आयुष्य, माझी आवड आणि उद्देश ज्याने मला केवळ बॉलिवूडच नव्हे, तर त्यापलीकडेही योगदान दिले. त्याची दखल घेतल्याबद्दल भारत सरकारचे धन्यवाद. या प्रवासात ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्या सर्वांचे मी आभार मानते.

यासाठी मी माझे वडील रवी टंडन यांची देखील ऋणी आहे, असेही तिने म्हटले आहे. रवीना टंडन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील असे एक नाव आहे. जिने 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि ग्लॅमरने सिनेविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली.

रवीना टंडनने मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. अभिनेत्री रवीना टंडनने 1991 मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दरम्यान, यावेळी देशातील सर्वोच्च पुरस्कारांसाठी 106 जणांची निवड करण्यात आली, ज्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!