आईची शपथ घेऊन सांगा की विशाल पाटील….! पडळकरांचे जयंत पाटलांना थेट आव्हान


सांगली : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. आता देखील ते म्हणाले, जयंतरावांनी आईची शपथ घेऊन सांगावं की विशाल पाटील खासदार व्हावेत, असं त्यांना वाटत होतं का? असं आव्हान गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

पडळकर यांच्या या टीकेमुळे येणाऱ्या काळात पाटील विरुद्ध पडळकर असा सामना रंगलेला पाहायला मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. आता गोपीचंद पडळकर यांच्या या आव्हानावर जयंत पाटील काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तसेच जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर म्हणाले, जयंत पाटलांनी त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केला होता, हे तुम्हाला माहीत आहे ना? जर ते विशाल पाटलाला खासदार करू शकत असतील तर त्यांनी त्यांच्या मुलाला केला असतं ना? असेही ते म्हणाले.

तसेच सगळ्या पोरांचे लॉन्चिंग झाले आहे. आर आर पाटील यांचे पोरग आमदार झालं याचं त्यांना आता सगळ्यात दुःख आहे. पण त्यांचे पोरगं काही आमदार होईना, याचचं सगळ्यात दुःख जयंत पाटील यांना आहे. अशीही टीका त्यांनी केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

तसेच जयंत पाटील हे सांगली आणि हातकणंगलेमध्ये त्यांच्या मुलांसाठी प्रयत्न करून बसलेत, असेही ते म्हणाले. तसेच हिंदू धर्म टिकला पाहिजे, परंपरा टिकल्या पाहिजे. हिंदू मुलींच्या संदर्भात हायेस्ट तिथे तक्रारी आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जो विषय पुढे आणलाय तो विषय अत्यंत अभ्यासपूर्ण पुढे आणलेला आहे. असेही ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!