सोरतापवाडीत नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार; पोक्सो कायद्याने गुन्हा दाखल करुन आरोपी अटकेत…


उरुळी कांचन : सोरतापवाडी ग्रामपंचायत एका नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केला असून उरुळीकांचन पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे.

आकाश रामहरी ओव्हाळ व अभिजीत खंडागळे (दोघेही रा. कोरेगाव मूळ शिवा फार्म ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ६४(१) पोक्सो , ७४, ३५१(२) ३,(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला नेऊन या दोघा आरोपींनी हा प्रकार केला आहे.

संबंधित तरुणीला आरोपीने वारंवार पाठलाग करून, तसेच “आय लव्ह यू” असे बोलून मानसिक त्रास दिला. आरोपी आणि त्याच्या मित्राने मिळून तरुणीला बोलावून घेतले.

त्यानंतर आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबध प्रस्थापित करुन अत्याचार केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण कांबळे हे करीत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!