बीड हादरलं! मामाच्या 10 वर्षीय चिमुकलीवर भाच्याकडून अत्याचार, आरोपी पसार; पोस्को गुन्हा दाखल


बीड : बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा संतापजनक घटना समोर आली असून संपूर्ण परिसर हादरला आहे. केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मामाच्या गावी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या 10 वर्षीय चिमुकलीवर तिच्याच भाच्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे कुटुंबीयांसह गावातही मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मामा-मामी शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्याच वेळी घरात एकटी असलेल्या लहान मुलीचा भाच्याने गैरफायदा घेतला. आरोपीने ही संधी साधत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. घटनेनंतर आरोपी घरातून पळून गेला. काही वेळानंतर मामा-मामी घरी परतल्यानंतर पीडित चिमुकलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला.

घटनेनंतर कुटुंबीयांनी तात्काळ युसुफ वडगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गंभीर दखल घेत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला ईटकुर परिसरातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

गावातील लोकांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. कुटुंबावर कोसळलेल्या या आघातामुळे परिसरात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!