पुणेकरांसाठी मोठा इशारा! नवले पुलासह या ठिकाणी आंदोलनास बंदी; नियम मोडल्यास थेट कारवाई..


पुणे : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवले पूल आणि टिळक चौक यांसारख्या अतिवर्दळीच्या व संवेदनशील ठिकाणी आता आंदोलन किंवा ‘रास्ता रोको’ करण्यास पूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे

उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. अलीकडे नसरापूर येथील घटनेनंतर नवले पूल आणि वडगाव पूल परिसरात मोठ्या प्रमाणावर ठिय्या आंदोलन झाले होते.

या आंदोलनामुळे मुंबई–बंगळुरू महामार्ग तब्बल चार ते साडेचार तास ठप्प झाला होता. परिणामी हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आणि वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुढील काळात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती वाहनसंख्या लक्षात घेता, आता मुंबईच्या धर्तीवर आंदोलनांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याची तयारी सुरू आहे.

संवेदनशील ठिकाणी आंदोलनांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच यासंदर्भात औपचारिक आदेश जारी केले जातील, असे पोलीस आयुक्त

अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे नवले पूल, टिळक चौक यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ‘रास्ता रोको’ किंवा आंदोलन केल्यास संबंधितांवर थेट कारवाई होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!