10 वेळा वाईट स्पर्श? ‘डर्टी पिक्चर’मागचं काळं सत्य उघड… मोनालिसाचा मोठा खुलासा!


कोची: कुंभमेळ्यातून व्हायरल होऊन प्रकाशझोतात आलेली मोनालिसा आता गंभीर आरोपांमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. सिनेमात संधी मिळाल्यानंतर तिचं आयुष्य बदललं, पण त्याचसोबत वादळही आलं. ‘द डायरी ऑफ मणिपूर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला अयोग्य वागणूक मिळाल्याचा धक्कादायक आरोप तिने केला आहे.

एर्नाकुलम सेंट्रल पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दिग्दर्शक सनोज मिश्रा आणि वकील अनिल विलायिल यांचं नाव समोर आलं आहे. एफआयआर २९ एप्रिल रोजी नोंदवण्यात आला.

मोनालिसाने कोचीतील पत्रकार परिषदेत सांगितलं की, शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने तिला तब्बल १० वेळा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. “मी सतत भीतीत होते, सेटवर सुरक्षित वाटत नव्हतं,” असा तिचा दावा आहे. या सगळ्या प्रकारानंतर तिने कुटुंबीयांकडे मदत मागितली, मात्र तिथूनही अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, असा आरोप तिने केला.

अखेरीस तिने कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप आहे. ३० एप्रिल रोजी ती न्यायालयात हजर झाली असून तिने अधिकृत जबाब नोंदवला आहे. हे प्रकरण मध्य प्रदेश पोलिसांकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तिच्या वैयक्तिक आयुष्यातही वाद सुरू आहेत. फरमानसोबतच्या लग्नाला कुटुंबाचा विरोध असून ‘लव्ह जिहाद’चे आरोप करण्यात आले आहेत. मात्र मोनालिसा आपल्या निर्णयावर ठाम आहे.

प्रसिद्धी, आरोप, कौटुंबिक वाद आणि कायदेशीर लढा, या सगळ्यात अडकलेली मोनालिसा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता या प्रकरणात पुढे काय घडतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!