बोरामणी हादरलं! एकाच घरातील आई व दोन मुलांची निर्घृण हत्या


सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गाव येथे भीषण घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांची, म्हणजे आई आणि तिच्या दोन मुलांची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृतांमध्ये गायत्री सुधाकर मस्के (वय 40), मुलगी प्रिया मस्के (वय 18) आणि मुलगा शिवराज मस्के (वय 16) यांचा समावेश आहे. ही घटना मध्यरात्री साधारण 12 वाजताच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अज्ञात व्यक्तीने घरात घुसून धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेत आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या गच्चीवर आढळला तर मुलाचा मृतदेह बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात सापडला.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, याआधी पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि चाकण परिसरातही अल्पवयीनांवरील अत्याचार आणि हत्येच्या घटना घडल्याने राज्यात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे ही सलग घडणारी गुन्हेगारी घटना कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून लवकरच आरोपीला अटक होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!