लाडक्या बहि‍णींना मोठा दिलासा? तीन महिन्यांचे पैसे एकत्र येणार? जाणून घ्या अपडेट…


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

मात्र, मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आता मे महिना सुरू झाल्याने तीन महिन्यांचे हप्ते एकत्र मिळून ₹4500 जमा होणार का, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, ई-केवायसी पडताळणीमुळे राज्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हप्ते रखडल्याची चर्चा अधिकच जोर धरत आहे.फेब्रुवारीपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात नियमित ₹1500 जमा झाले होते. मात्र त्यानंतर मागील दोन ते तीन महिन्यांपासून कोणताही हप्ता जमा झालेला नाही.

सध्या ई-केवायसी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची शक्यता वर्तवली जात असून, ती पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता जमा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र मार्च-एप्रिलचे ₹3000 मिळणार की मार्च-एप्रिल-मेचे एकत्र ₹4500 मिळणार, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!