अलर्ट! १ मेपासून ९ मोठे बदल लागू; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम…


पुणे : उद्या पासून म्हणजेच १ मे २०२६ पासून सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहारांवर थेट परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. बँकिंग, विमा, गुंतवणूक, डिजिटल पेमेंट्स आणि ऑनलाइन सेवांशी संबंधित या बदलांमुळे दैनंदिन व्यवहारांची पद्धत काही प्रमाणात बदलू शकते.

त्यामुळे कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी या नव्या नियमांची माहिती वेळेवर घेणे गरजेचे ठरणार आहे. आपण जाणून घेऊयात काय बदल होणार आहेत ते..

UPI आणि डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित..

रिझर्व्ह बँकेच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, UPI आणि डिजिटल व्यवहारांसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) अधिक कडकपणे लागू केले जाणार आहे. याशिवाय, UPI च्या माध्यमातून कार्डलेस एटीएम व्यवहार मोफत मर्यादेत समाविष्ट केले जातील. मात्र ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर १७ ते २१ रुपये शुल्क लागू शकते.

सुवर्ण रोख्यांवरील कर नियम कडक..

सुवर्ण रोखे बाबतही कर नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता केवळ सरकारकडून थेट खरेदी केलेल्या रोख्यांनाच करमुक्त लाभ मिळेल. दुय्यम बाजारातून खरेदी केल्यास भांडवली नफा कर लागू होऊ शकतो.

EPFO 3.0 बद्दल चर्चा..

भविष्यात पीएफ रक्कम एटीएम किंवा यूपीआयद्वारे काढण्याची सुविधा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही या बदलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑनलाइन गेमिंग क्षेत्रात मोठा बदल…

१ मेपासून ऑनलाइन गेमिंग उद्योगासाठी नवे नियम लागू होणार आहेत. केंद्र सरकारने ‘ऑनलाइन गेमिंग अथॉरिटी ऑफ इंडिया’ स्थापनेला मंजुरी दिली असून, ‘ऑनलाइन गेमिंग रेग्युलेशन ॲक्ट २०२५’ अंतर्गत कंपन्यांना नव्या मानकांचे पालन करावे लागेल. विशेष म्हणजे, गेम प्रमाणपत्रांची वैधता आता ५ वर्षांवरून १० वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

LPG डिलिव्हरीसाठी OTP अनिवार्य…

गॅस चोरी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी एलपीजी सिलिंडर डिलिव्हरीवेळी ओटीपी किंवा DAC कोड अनिवार्य करण्यात आला आहे. बुकिंगनंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला कोड डिलिव्हरीवेळी सांगितल्याशिवाय सिलिंडर मिळणार नाही.

PMJJBY आणि PMSBY प्रीमियम कपात…

मे महिन्यात ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) यांचे वार्षिक प्रीमियम आपोआप बँक खात्यातून वजा केले जातील. यासाठी अनुक्रमे ४३६ रुपये आणि २० रुपये कपात होणार आहे. त्यामुळे खातेदारांनी आपल्या खात्यात पुरेशी शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

LPG सिलिंडर दरात बदलाची शक्यता…

दर महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्या एलपीजी दरांचा आढावा घेतात. सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे १ मे रोजी घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरगुती बजेटवर याचा परिणाम होऊ शकतो.

SBI कार्डधारकांसाठी नवे नियम…

१ मेपासून एसबीआय क्रेडिट कार्ड्सच्या विलंब शुल्कात बदल होणार आहेत. कमी थकबाकी रकमेवरही शुल्क आकारले जाऊ शकते. तसेच काही कार्ड्सवरील वार्षिक शुल्क माफीसाठीच्या अटींमध्येही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे कार्डधारकांनी नियम समजून घेणे आवश्यक आहे.

e-KYC अपडेट अनिवार्य…

बँक खात्यांसाठी ई-केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत १ मे ठेवण्यात आली आहे. केवायसी अपूर्ण असल्यास खात्यावर व्यवहारांवर निर्बंध येऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांनी बँक शाखा, नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपली माहिती तातडीने अपडेट करावी.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!