पुण्यात खळबळ! देहूत गोळ्यांचा पाऊस, भाजप नेत्याची भररस्त्यात हत्या, शहरात भीतीचे वातावरण….


पुणे : दिवसागणिक पुण्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. कोयता घेऊन रस्त्यावर फिरणे, टोळीयुद्ध, वाहनांची जाळपोळ तसेच किरकोळ कारणांवरून गंभीर हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

अशातच पुण्यातील देहूरोड परिसरात काल रात्री घडलेल्या थरारक गोळीबार घटनेने शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भररस्त्यात अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेला तरुण हा भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा बाहेर असलेल्या रमेश रेड्डी यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. कोणतीही वादावादी न होता थेट त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. सलग गोळ्यांच्या आवाजाने परिसर हादरला. काही क्षणांतच ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. वर्दळीच्या भागात अशा प्रकारे खुलेआम गोळीबार होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाला आणखी धक्कादायक पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. रमेश रेड्डी यांचे भाऊ विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांची १३ फेब्रुवारी २०२५ रोजी अशाच प्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अवघ्या एका वर्षाच्या आत रेड्डी कुटुंबातील दुसरी हत्या झाल्याने या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांनी या प्रकरणात जुना वाद, आर्थिक व्यवहार, वैयक्तिक वैर किंवा गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष या सर्व शक्यतांचा सखोल तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती, त्यांचे अलीकडील व्यवहार आणि हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. दरम्यान घटनास्थळाजवळील CCTV कॅमेऱ्यांमध्ये काही संशयित हालचाली कैद झाल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!