‘तुझ्या आईचा आजार बरा करतो’ म्हणत भोंदूबाबाचा हैवानपणा; पुण्यात अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार, गर्भवती होताच उघड झाले धक्कादायक कांड


पुणे : आईचा गंभीर आजार ‘दैवी शक्ती’ने बरा करतो, असे आमिष दाखवत १५ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन भोंदू बाबांना अटक केली आहे. या घटनेमुळे जुन्नर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. पंकज देवराम घोलप आणि नाना बर्डे (रा. येडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची आई दीर्घकाळापासून आजारी होती. याचाच गैरफायदा घेत आरोपींनी अंगारा, जादूटोणा करून आजार बरा करण्याचे आश्वासन दिले. या बहाण्याने मुख्य आरोपी पंकज घोलप याने पीडितेशी जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

या शोषणातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने नकार देत जीवे मारण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली.

यानंतर आळेफाटा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!