हृदयद्रावक! नांदेडमध्ये पाण्यात बुडून चार चिमुकल्यांचा अंत; परिसरात शोककळा..


नांदेड : नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. नाल्यातील पाण्यात बुडून चार लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत मुलांचे वय ७ ते १० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. खेळत असताना ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात झालेल्या दुर्दैवी घटनेमागील कारण समोर आले आहे. खोदकामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. परिसरातील काही लहान मुले खेळण्यासाठी त्या ठिकाणी गेली असताना, खेळता खेळता ते पाण्यात पडले. पाण्याची खोली लक्षात न आल्याने चारही मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी या प्रकरणी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, अशा धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!