सुनेत्रा पवारांसाठी आता रोहित पवार मैदानात, आजपासून बारामतीत प्रचार सुरू, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?


बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. यानंतर आता बारामती विधानसभा पोटनिवडणूक लागली असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मैदानात उतरले आहेत. अनेकांनी प्रयत्न करून देखील ही निवडणूक बिनविरोध झाली नाही. मात्र प्रमुख पक्ष्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सुनेत्रा पवार यांचा विजय एकतर्फी होणार हे निश्चित आहे.

असे असताना सुनेत्रा पवार यांनी प्रचार सुरु केला आहे. आता आजपासून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील बारामतीत लोकांच्या भेटीगाठी घेत प्रचार सुरू केला आहे. आज अजित पवार यांचे मूळ गाव असलेल्या काटेवाडी येथील मारुतीरायाचे दर्शन घेऊन रोहित पवार यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येणार का? अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.

यावेळी ते म्हणाले, आदरणीय पवार साहेब, अजितदादा किंवा सुप्रियाताई या सर्वांच्या प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा बारामतीत कन्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवूनच प्रारंभ झाला आहे. त्याच अनुषंगाने आज अजितदादांच्या जागी सुनेत्राकाकी या पोटनिवडणूक लढवत आहेत.

त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने याच मंदिरात श्री मारुतीरायचं, श्री प्रभू श्रीरामचंद्र, श्री दत्त महाराज आणि महादेवाचं दर्शन घेतलं. तसंच सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांच्या समाधीलाही अभिवादन केलं. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, बारामती तालुक्यात भावनिक वातावरण निर्माण झाले असून सुनेत्रा पवार मोठ्या मतांनी निवडून येतील, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. सध्या अजित पवार यांच्या दुःखद निधनाने बारामतीकर अजूनही दुःखात आहेत. सध्या पवार कुटुंब हे प्रचारात उतरले असून सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार देखील प्रचार करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!