अमरावती अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट! 180 तरुणींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मोहम्मदला अटक, एमआयएमचा पदाधिकारी असल्याची माहिती…

पुणे : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अमरावतीत एका तरुणाने 180 तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी एमआयएम पक्षाचा पदाधिकारी असल्याचा दावा करण्यात येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या तरुणाने अनेक युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.या तरुणाने 180 तरुणींचे लैंगिक शोषण करून 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला. त्यानंतर सूत्रे फिरवून पोलिसांनी आरोपीला अटक केली.आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन, तपासाला सुरुवात केली आहे. अनेक धक्कादायक अश्लील व्हिडीओ मोबाईलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित आरोपीच्या मोबाईलमध्ये त्याचे सात ते आठ तरुणी सोबत फोटो आणि व्हिडिओ आहेत.आरोपीने हे व्हिडिओ इतर मित्रांना पाठवले का याचाही शोध पोलीस घेत आहेत. आरोपी तरुणाचे तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.या तरुणाला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला 21 एप्रिलपर्यंत म्हणजे 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.गेल्या तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत असताना पोलिसांनी सुमोटो कारवाई का केली नाही? असा सवाल करीत गुन्हा दाखल करून कारवाई न केल्यास एसपी ऑफिसमोर आंदोलन करण्याचा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणातून आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
