सरकारी अधिकाऱ्यांना पगार पुरेना! अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल


पुणे : अकोला जिल्ह्यातील एका अप्पर अधिकाऱ्याने खाणी सुरु ठेवण्यासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खाण मालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. संबंधित अधिकाऱ्याविरोधात BNS कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रमोद गायकवाड असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या अधिकाऱ्याने गौण खनिजाच्या खाणी, गिट्टी आणि दगड खाणी सुरू ठेवण्यासाठी प्रत्येकी 15000 रुपयांची मागणी तसेच धमकी दिल्याचा आरोप खाण मालकांनी केला होता.त्याच्या विरोधात पुरावे म्हणून खान मालकांनी ऑडिओ क्लिप्स देखील सादर केले.मात्र अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले होते.

अकोला जिल्ह्यात गौण खनिजाच्या जवळपास 70 खाणी आहेत. या खाणीमध्ये दगड,गिट्टी, क्रशर आणि मुरूम खाणीचा समावेश आहे. यास खाणी चालू ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडून पैशाची मागणी करण्यात आली. त्यानंतर तात्काळ खानमालकांनी अकोल्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गायकवाड यांच्याविरोधात तक्रार केली. यानंतर अधिकाऱ्याविरुद्ध नऊ दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

या संपूर्ण चौकशीनंतर या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्या विरुद्ध अप.नं. 270/2026 कलम 308(2), 351 (1), BNS सह कलम 7 PCA नुसार गुन्हा दाखल केला आहे. 15 हजार रुपये खंडणी मागितली, पैसे न मिळाल्यास तुमचे व्यवसाय बंद पाडू, अशा धमकी प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!