खरातचा गेमओव्हर! ईडीकडून तब्बल 13 तास चौकशी, मर्सिडीज जप्त, बँक खाती गोठवली


पुणे: अनेक महिलांना फसवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या मुसक्या आवळण्यास तपास यंत्रणांनी सुरुवात केली आहे. या प्रकरणात आता ईडीने एन्ट्री केली असून तब्बल तेरा तासाहून अधिक वेळ अशोक खरातची चौकशी केली. यात ईडीच्या हाती मोठ घबाड सापडल्याची माहिती आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महिलांची लैंगिक शोषण आणि अत्याचार करणारा खरात याच्या तृप्तबाला घराची ईडीकडून तेरा तासांपासून झाडाझडती सुरु होती. या कारवाईमध्ये खरात याची आलिशान मर्सिडीज गाडी ED कडून सील करण्यात आली आहे. तसेच आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त दस्तऐवजांची तपासणी ED कडून करण्यात आली आहे.

खरातच्या घराच्या झाडाझडती दरम्यान जवळपास 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली आहे.तसेच 2 कोटी 50 लाखांची बँकेतील रक्कम गोठवली आहे.खरातची एक मर्सिडीज बेंझ गाडीही जप्त करण्यात आली.तसेच पुण्यातील प्रकाश पोफळेच्या घरातून 42 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

अध्यात्माच्या नावाखाली लोकांच्या अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेणाऱ्या अशोक खरांतच्या पापाचा घडा भरत चालला आहे. याप्रकरणी तपास यंत्रणा जोरदार वेगाने तपास करत असून
खरातकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
ईडीचा तपास मुख्यतः आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉन्डरिंग आणि बेनामी मालमत्ता यावर केंद्रित आहे.

पोलिस आणि विशेष तपास पथक तपासात ब्लॅकमेल, शोषण आणि डिजिटल पुरावे समोर आले असून या सर्वामुळे या प्रकरणात अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!