पुणे हादरलं! प्राचार्याने केला पीएचडीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, आत्महत्येपूर्वीची धक्कादायक सुसाईड नोट समोर..


पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीचा शिकवणाऱ्या प्राध्यापकांनेच विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थिनीने या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असून आत्महत्या पूर्वी लिहिलेली सुसाईड नोट हाती लागली आहे. या प्रकरणाने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,संबंधित तरुणी बॉटनी या विषयात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे पीएचडी करीत होती.या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक असणाऱ्या सहाय्यक संचालक डॉ. ए. बिन्नियमिन हा 2025 पासून तिच्याशी अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत होता.त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे.याप्रकरणी आरोपी बिन्नियमिनला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

संबंधित तरुणी या मानसिक धक्क्यातून सावरली नव्हती. त्यामुळे तिने आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले आहे दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवस आधी बिन्नियमिन याने स्टॅम्प पेपरवर पुन्हा असा प्रकार करणार नाही. चूक झाली असे लिहून दिले होते. मात्र अखेर त्या तरुणीने आपल आयुष्य संपवलं.

या सर्व प्रकारानंतर विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बिन्नियमिन याला पकडण्यात आले. त्याला बुधवार 15 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असून पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!