ग्रामपंचायतीच्या रिक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदांच्या निवडणुकीचा अखेर बार उडाला; मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकाही लवकरच…

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलं आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये थेट सरपंचपदासाठी 471 आणि 3120 सदस्य रिक्त जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या अन् गावागावात निवडणुकांचा धुरळा उडू लागला आहे. ग्रामपंचायत सदस्यपदांच्या तसेच सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी मतदान होणार आहे. 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
पाहा कसा आहे निवडणूक कार्यक्रम…
नामनिर्देशनपत्रे 7 ते 13 एप्रिल 2026 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 15 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 29 एप्रिल 2026 रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे.

कुठे कुठे होणार निवडणूक…
ठाणे – 78 ग्रामपंचायती, 15 सरपंच रिक्त, 101 सदस्य रिक्त, एकूण 116
पालघर – 127 ग्रामपंचायती, 15 सरपंच रिक्त, 168 सदस्य रिक्त, एकूण 183
रायगड – 127 ग्रामपंचायती, 30 सरपंच रिक्त, 170 सदस्य रिक्त, एकूण 200
रत्नागिरी – 114 ग्रामपंचायती, 14 सरपंच रिक्त, 160 सदस्य रिक्त, एकूण 174
सिंधुदुर्ग – 105 ग्रामपंचायती, 12 सरपंच रिक्त, 143 सदस्य रिक्त, एकूण 155
नाशिक – 133 ग्रामपंचायती, 12 सरपंच रिक्त, 191 सदस्य रिक्त, एकूण 203
धुळे – 47 ग्रामपंचायती, 11 सरपंच रिक्त, 47 सदस्य रिक्त, एकूण 58
जळगाव – 81 ग्रामपंचायती, 13 सरपंच रिक्त, 92 सदस्य रिक्त, एकूण 105
अहिल्यानगर – 64 ग्रामपंचायती, 5 सरपंच रिक्त, 85 सदस्य रिक्त, एकूण 90
नंदुरबार – 67 ग्रामपंचायती, 10 सरपंच रिक्त, 70 सदस्य रिक्त, एकूण 80
पुणे – 155 ग्रामपंचायती, 33 सरपंच रिक्त, 226 सदस्य रिक्त, एकूण 259
सोलापूर – 35 ग्रामपंचायती, 13 सरपंच रिक्त, 34 सदस्य रिक्त, एकूण 47
सातारा – 138 ग्रामपंचायती, 34 सरपंच रिक्त, 172 सदस्य रिक्त, एकूण 206
सांगली – 82 ग्रामपंचायती, 21 सरपंच रिक्त, 93 सदस्य रिक्त, एकूण 114
कोल्हापूर – 100 ग्रामपंचायती, 39 सरपंच रिक्त, 89 सदस्य रिक्त, एकूण 128
छत्रपती संभाजीनगर – 32 ग्रामपंचायती, 6 सरपंच रिक्त, 37 सदस्य रिक्त, एकूण 43
बीड – 81 ग्रामपंचायती, 16 सरपंच रिक्त, 72 सदस्य रिक्त, एकूण 88
नांदेड – 82 ग्रामपंचायती, 22 सरपंच रिक्त, 143 सदस्य रिक्त, एकूण 165
धाराशिव – 25 ग्रामपंचायती, 9 सरपंच रिक्त, 23 सदस्य रिक्त, एकूण 32
परभणी – 20 ग्रामपंचायती, 6 सरपंच रिक्त, 16 सदस्य रिक्त, एकूण 22
जालना – 36 ग्रामपंचायती, 11 सरपंच रिक्त, 28 सदस्य रिक्त, एकूण 39
लातूर – 60 ग्रामपंचायती, 10 सरपंच रिक्त, 58 सदस्य रिक्त, एकूण 68
हिंगोली – 9 ग्रामपंचायती, 3 सरपंच रिक्त, 11 सदस्य रिक्त, एकूण 14
अमरावती – 69 ग्रामपंचायती, 11 सरपंच रिक्त, 98 सदस्य रिक्त, एकूण 109
अकोला – 76 ग्रामपंचायती, 13 सरपंच रिक्त, 126 सदस्य रिक्त, एकूण 139
यवतमाळ – 47 ग्रामपंचायती, 4 सरपंच रिक्त, 86 सदस्य रिक्त, एकूण 90
वाशिम – 51 ग्रामपंचायती, 14 सरपंच रिक्त, 49 सदस्य रिक्त, एकूण 63
बुलडाणा – 59 ग्रामपंचायती, 11 सरपंच रिक्त, 72 सदस्य रिक्त, एकूण 83
नागपूर – 86 ग्रामपंचायती, 18 सरपंच रिक्त, 95 सदस्य रिक्त, एकूण 113
वर्धा – 27 ग्रामपंचायती, 3 सरपंच रिक्त, 38 सदस्य रिक्त, एकूण 41
चंद्रपूर – 39 ग्रामपंचायती, 3 सरपंच रिक्त, 53 सदस्य रिक्त, एकूण 56
भंडारा – 65 ग्रामपंचायती, 15 सरपंच रिक्त, 63 सदस्य रिक्त, एकूण 78
गोंदिया – 69 ग्रामपंचायती, 15 सरपंच रिक्त, 69 सदस्य रिक्त, एकूण 84
गडचिरोली – 58 ग्रामपंचायती, 4 सरपंच रिक्त, 142 सदस्य रिक्त, एकूण 146

एकूण: 2444 ग्रामपंचायती, 471 सरपंच रिक्त, 3120 सदस्य रिक्त, एकूण 3591 जागा