पुण्यातील भाजप नेत्या अडचणीत?ऑडिओ क्लिप व्हायरल, “उभा चिरून टाकीन, जीभ हसडून…..


पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात भाजपच्या पदाधिकारी आशा बुचके या एका प्रकरणात मोठ्या अडचणीत आल्या आहेत. त्यांच्यावर एका युवकाला पैशासाठी धमकवण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणातील ऑडिओ क्लिप समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत रोशन बिरमल या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या पदाधिकारी आशा भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांना बोलावले होते. त्यांनी पैशासाठी दबाव टाकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.पैसे दिले नाहीत तर “उभा चिरून टाकीन, जीभ हसडून टाकेन” अशा धमकीच्या भाषेत आशा बुचके बोलल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील ऑडिओ क्लिप मध्ये धमकीची भाषा स्पष्ट ऐकू येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

भाजपच्या पदाधिकारी आशा बुचके यांच्यावर यापूर्वीही विविध वाद आणि धक्काबुक्कीचे आरोप झाले होते. त्या पूर्वी शिवसेनेत सक्रिय होत्या आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. हा नवा आरोप त्यांना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात टाकणारा ठरला आहे.
संबंधित व्यक्तीने केलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये ही भाषा स्पष्ट ऐकू येत आहे.त्यामुळे“लोकप्रतिनिधी की टोळीचा वसुली एजंट?” असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

याबाबत रोशन बिरमल यांनी सांगितले की, त्यांना सरकारी गेस्ट हाऊसमध्ये बोलावून जबरदस्तीने चेक घेण्यात आला. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी त्यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!