खरात प्रकरणाची व्याप्ती वाढली! शिजूका नॉडीचे असंख्य फोन कॉल्स…., नव्या एन्ट्रीनं खळबळ


पुणे : महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या नाशिकचा भोंदू बाबा यांने कोठडीत स्वतःचा मृत्यू दिसत असल्याची भविष्यवाणी केली होती.दरम्यान आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठं विधान केलं आहे. भोंदू खरात प्रकरणात “शिजूका नॉडी ” या एका नावाचे असंख्य फोन कॉल्स आले आहेत,असा दावा दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे या खरात प्रकरणात झालेल्या नव्या एन्ट्रीने खळबळ उडाली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी असे म्हटले आहे की,. भोंदू अशोक खरातने शिजूका नॉडी नाव ठेवून लोकांना मास्क केलं आहे,यामागे मोठे लोक आहेत , इनकमिंग आऊट गोइंग आहे असा दणदणीत आरोप दमानिया यांनी केला आहे. तसेच रुपाली चाकणकरांचे त्याला 177 कॉल्स आहेत याचा पुनरुच्चार करतानाच त्यांना अद्याप समन्स नाही, चाकणकर यांनी त्याला एवढे कॉल का केले, असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला.

चौफेअर चौकशीने हैरान झालेल्या अशोक खरातने स्वत:चे भविष्य सांगताना “माझं मरण इथेच आहे” असे म्हटलं. पोलिस कोठडीत तो सुरक्षित नसल्याचा दावा आत्तापर्यंत अनेकांनी केला आहे, आता त्यालाही आपण इथून बाहरे पडू शकणार नसल्याचं वाटायला लागलंय असं खरातच्या या बोलण्यातून स्पष्ट दिसत आहे .

दरम्यान अशोक खरात याच्या जीवाला धोका आहे, त्याने हे कोठडीत असतानाच विधान केलंय. त्यामुळे आता आम्हाला अशी धास्ती वाटत आहे कि,हे सगळं मिटवण्यासाठी त्याला संपवलं जाऊ शकतं, असं दमानिया म्हणाल्या. गोष्टी, बरीच माहिती बाहेर येऊ नये यासाठी खरातच्या जीवनाचं बरं वाईट होईल, असं म्हणत त्यामुळे खरातला प्रोटेक्शन द्यावं अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!