“माझं मरणं जेलमध्ये “, भोंदू खरातला कोठडीत दिसू लागला स्वतःचा मृत्यू, चौकशीत केली थेट भविष्यवाणी..


पुणे : धार्मिक विधी आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात सध्या कोठडीत असून त्याच्याभोवतीचा फास आणखीन आवळला आहे. आता पर्यंत त्याच्याविरोधात एकूण 15 गुन्हे दाखल झाले आहेत, दैवी शक्ती असल्याचं सांगून अनेकांचं भविष्य सांगणाऱ्या यां खरातने जेलमध्येच आपला मृत्यू असल्याची भविष्यवाणी केली आहे.

अशोक खरात यांने पोलीस चौकशीत हतबल प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी इथून बाहेर पडेन, असं वाटत नाही. माझं मरणं इथेच आहे’ असं वक्तव्य खरात याने केलं आहे. तसेच त्याने विशेष तपास पथकाद्वारे सुरू असलेल्या चौकशीत खरातने फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.खरातवर सर्वात गंभीर आरोप म्हणजे धार्मिक विधींच्या नावाखाली त्याने केलेले महिलांचे लैंगिक शोषण. अनेक पीडित महिलांनी त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या असून, ‘आध्यात्मिक शक्ती’ मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते.

याव्यतिरिक्त, त्याने महिलांचे शोषण एवढ्यावरच तो न थांबता त्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही उघड झाले आहे. खरातच्या अटकेनंतर आता अनेक नवीन तक्रारदार समोर येत असून, तपासात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खरातच्या काळ्या कारनाम्याचीं खडान खडा माहिती त्याची पत्नी कल्पना खरात हिला असून ती सध्या फरार झाली आहे.
पोलिसांनी अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात देखील कारवाईचं पाऊल उचललं आहे. पोलिसांनी फरार असलेल्या कल्पना खरात याचे एक बँक खाते ईडी कडून सील करण्यात आलं आहे. पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!